बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देउळगाव राजा पोलिसांची मोठी कारवाई; सातेफळ रोडवरील जुगार अड्ड्याचा पर्दाफाश!

देउळगाव राजा येथे चिकूच्या मळ्यात जुगारावर पोलिसांचा छापा; तिघांना अटक, मुद्देमाल जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देउळगाव राजा :येथील सातेफळ रोडवर असलेल्या एका चिकूच्या मळ्यात सुरू असलेल्या जुगार अडड्यावर पोलिसांनी गुरुवारी (दि. २८ ऑगस्ट) दुपारी ४ वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य असा एकूण १,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देउळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपींवर झाली कारवाई:

१. सोहेल शहा उस्मान शहा (वय २४, रा. समता कॉलनी, देउळगाव राजा)
२. कृष्णा खंडू बनकर (वय २९, रा. सातेफळ, ता. जाफराबाद, जि. जालना)
३. शेख नौशाद शेख रफिक (वय २६, रा. लोणार गल्ली, देउळगाव राजा)

अशी झाली कारवाई:

सातेफळ रोडवरील चिकूच्या मळ्यात काही जण पत्ते खेळून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी धाड टाकली. यावेळी आरोपी जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांना आरोपी सोहेल शहा याच्या अंगझडतीत २५० रुपये, कृष्णा बनकर याच्याकडे ३०० रुपये आणि शेख नौशाद याच्याकडे ३५० रुपये रोख आढळले. तसेच जुगाराच्या डावावरून ३०० रुपये नगदी आणि ५२ ताशपत्ते (किंमत ५० रुपये) असा एकूण १,२०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ३९६/२०२६, कलम १२ (अ) मुजुका (महाराष्ट्र जुगार कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई यांनी केली असून, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे करत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button