बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

25 वर्षीय युवकाची राहत्या घरी आत्महत्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी: गजानन तांगडे खामगांव

खामगाव तालुक्यातील मांडका येथे 25 वर्षे युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 28ऑगस्ट रोजी सकाळ च्या सुमारास उघडकीस आली.निखिल अभिमन्यू खंडारे असे मृत युवकांचे नाव आहे. या घटनेची माहिती पिंपळगाव राजा पोलिसांना देण्यातआली.पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निखिल हा मांडका येथील राहत्या घरी राहत होता. 28ऑगस्ट रोजी सकाळ च्या सुमारास 8 वाजण्यापूर्वी त्याचे चुलत भाऊ अभिमन्यू खंडारे व त्यांच्या पत्नी शिरजगाव देशमुख येथून घरी आले असता, घराचा दरवाजा वाजविला. मात्र त्यांना घरच्या आतून कोणताचा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच त्यांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला असता, निखिल हा त्यांना घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच घटनेची माहिती पिंपळगाव पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी दाखल घेत पंचनामा केला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button