अपघातबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव बसस्थानकात स्लॅब कोसळला काळाचा घाला!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव, दि. २८ नेहमी भाविक प्रवाशांची वर्दळ असलेल्या संतनगरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव बसस्थानकावर आज दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी अंदाजे ४. ३० वाजता प्रवासी बसस्थानकावर फलाट क्रम ांक १० वर बसची प्रतीक्षा करीत असताना बसस्थानकातील स्लॅब अचानकपणे खाली कोसळला यामध्ये लहान मुलासह चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.
याबत प्राप्त माहिती अशी कीं. आज २८ ऑगस्ट रोजी रोजी सायंकाळी अंदाजे ४. ३० वाजता नांदुरा व संग्रामपूर तालुक्यातील प्रवासी बसस्थानकावर फलाट क्रम ांक १० वर बसची प्रतीक्षा करीत असताना बसस्थानकातील स्लॅब अचानकपणे खाली कोसळला.
सदर स्लॅबचा काही भाग
एका महिलेच्या हाता वर पडल्याने ती गंभीर जखमी झाली.
तसेच, सदर घटनेमध्ये विमल भिकाजीं पवार, भिलखेड ता. संग्रामपूर, वय ६० वर्ष, रेखा रामदास बावस्कर, अंबोडा ता. नांदुरा, वय ४० वर्ष, कोमल गणेश बावस्कर, अंबोडा ता. नांदुरा, वय नांदुरा, वय ३५ वर्ष,
सुहास गणेश बावसकर, अंबोडा ता. नांदुरा, वय ५ वर्ष
हे चार जन जखमी झाले. घटना घडताच उपस्थित प्रवासी व संबंधित कर्मचाऱ्यांनी तात्काळ जखमींना मदत करून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सदर घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. राज्यातील बसस्थानके स्मार्ट करण्याच्या गप्पा करणाऱ्या परिवहन मंडळाने आधी आहेत ती बसस्थानकाने सुस्थितीत
करुन प्रवाशांना योग्य त्या सुविधा पुरवाव या व त्यानंतर स्मार्ट बसस्थानके करण्याच्या गप्पा म ाराव्या असा सवाल या निमित्ताने प्रवाशी उपस्थित करीत आहे.
शेगाव बसस्थानक हे बाराही महिने प्रवाशांनी भरगच्च भरलेले असते. त्यामुळे शासनाने आधी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button