महाराष्ट्रसामाजिक
चैत्यभूमीयय् दादर मुंबई येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास अभिवादन

शेगाव प्रतिनिधी मिलिंद चराटे
चैत्यभूमीयय् दादर मुंबई येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आले होते. हे असे प्रत्येक वेळी येत असतात, आपल्या इतरत्र भाषणात ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारानुसार आम्ही राज्याचा कारभार करू अशा वलग्ना नेहमी करीत असतात; पण तशी अंमलबजावणी मात्र करीत नाहीत. ओठात एक अन कृतीत मात्र दुसरेच असा यांचा कारभार असतो.
आता यापुढे असे चालणार नाही. ही आताच्याही राज्यकर्त्यांनी समजून घ्यावे.
एड बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत होतेच, अभिवादन झाल्यावर सर्वमिळून त्रिसरण पंचशील सामूहिकरित्या झाले.




