भोन बुद्ध स्तुपाचे जतन संवर्धन संदर्भात कोणती उपाययोजना राबविण्यात आली? सुजित बांगरआजाद समाज पार्टीचे बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन……!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
भोन:- २७ ऑगस्ट २०२६
आज संग्रामपूर तालुक्यातील भोन या गावातील सम्राट अशोककालीन बुद्ध स्तुपाच्या जतन आणि संवर्धना संदर्भात आजाद समाज पार्टीच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की संग्रामपूर तालुक्यातील भोन या गावात प्राचीन सम्राट अशोक कालीन पवित्र “बुद्ध स्तूप” असून त्यासंदर्भात अनेक इतिहासकार, संशोधक यांनी अनेक पुराव्यानिशी ते सिद्ध केले आहे. त्याचे उत्खनन व्हावे व पवित्र अशा प्राचीन सम्राट अशोक कालीन बुद्ध स्तुपाचे जतन /संवर्धन व्हावे या साठी यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने,आंदोलने,मोर्चे सुद्धा काढलेले आहे. आज पुन्हा आजाद समाज पार्टीच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे की भोन येथील पवित्र अशा सम्राट अशोक कालीन बुद्ध स्तुपाचे जतन /संवर्धन करण्यात यावे व त्या स्तुपाचे जतन संवर्धन होणार अशी चर्चा देखील समाजमनामध्ये आहे. परंतु प्रत्यक्ष तसे होतांना दिसत नाही आहे असा आरोप निवेदनातून करत आजपावेतो त्या प्राचीन सम्राट अशोक कालीन भोन बुद्ध स्तुपाचे जतन/ संवर्धन संदर्भात कोणती उपाययोजना राबविण्यात आली? किंवा राबवण्यात येतं आहे? असा सवाल करत यासंदर्भात आम्हाला सविस्तर माहिती पुरविण्यात यावी अशीही मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुजित बांगर चिखली तालुका अध्यक्ष महादेव जाधव, विजय इंगळे, गौतम वानखडे, शरद आराख, संदिप अजने, हिरकन्या अजने सुनीता बिलेवार,देविदास अजने, देवमन अजने,भीमराव अजने,विठ्ठल ठाकरे,अजाबराव जमाव, दिलीप जमाव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



