खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसंपादकीय

वाचन संस्कृती वृध्दींगत करण्याची आवश्यकता : आमदार राजू भोळे

वाचन संस्कृती वृध्दींगत करण्याची आवश्यकता : आमदार राजू भोळे
जळगाव :- आजच्या युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे व त्याचा वापर मनोरंजना करिता तर काही प्रसंगी भावना भडकविण्या करिता केला जातो त्यामुळे लोकांना पुस्तकातून खरी माहिती मिळावी व त्याच्या ज्ञानात भर पडावी या करिता वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत आमदार राजू मामा भोळे यांनी व्यक्त केले .
सारा फाऊंडेशन तर्फे वाघ नगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करतांना आमदार भोळे बोलत होते . त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर , भगवान बुद्ध यांच्या जीवनातील काही प्रसंगाचा उल्येख करून या पासून तरुणांनी प्रेरणा घ्यावी असेही सांगितले . या प्रसंगी आमदार राजू मामा भोळे यांनी या वाचनालयास पाच सिमेंटचे बाकं व वर्षभराकरिता पाच दैनिकं देण्यात येत असल्याची घोषणा केली .
ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज भारतात वाचन संस्कृती वाढावी म्हणून मोठ्याप्रमाणात लोक प्रयत्नशील आहे . भारतात हजारो वर्षांपासून दोनच वर्ग वाचन प्रिय असून ते आजही तेवढेच वाचन करतात . बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी १०० कोटींची पुस्तकं विकली गेली यातून हा वर्ग किती वाचन प्रिय आहे हे दिसून येते . तिसरा वर्ग वाचनाच्या जवळ आला हे खरे आहे मात्र तो आता दूर दूर जात असल्याचे दिसत आहे .
नंदुरबारचे तहसीलदार डी. पी. सपकाळे यांनी सांगितले की आज व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी तयार झाली आहे . यामुळे यातून जे विद्यार्थी बाहेर पडतात ते व्हॉट्स व्हॉट्स करत राहतात . आज पुस्तकं विकत घेणे , ती वाचणे कालबाह्य होऊ पाहत आहे मात्र पुस्तकं , वर्तमानपत्र हेच माणसाला त्याच्या प्रश्नाची उत्तरे देत असतात . ती वाचणे , अभ्यासणे काळाची गरज आहे . त्याचा वापर आपले ज्ञान विस्तारित करण्या करिता होतो हे आपण समजून घ्यावे .
नगरसेवक सुरेश सोनवणे , री. पा. ई. चे अनिल अडकमोल , ॲड. राजेश गवई , ग्राम विस्तार अधिकारी प्रीतम शिरतुरे यांची समयोचीत भाषणे झाली .
प्रास्ताविकपर भाषणात वाचनालयाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत भालेराव यांनी सांगितले की आज या वाचनालयात तीनशे पुस्तकं असून पाच दैनिकं लावण्यात आली आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सपकाळे , स्वागत डॉ. अशोक सैंदाणे यांनी तर आभारप्रदर्शन बापू साळुंके यांनी केले . कार्यक्रमास वाघ नगरातील स्त्री पुरुष मोठ्यासंख्येने उपस्थित होते. सुरवातीस भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button