बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

ऐतिहासिक सावखेड भोई व गिरोली वेशींच्या संवर्धनासाठी मनसेचा एल्गार; अमित ठाकरे मैदानात!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या सावखेड भोई वेश आणि गिरोली वेश यांच्या तातडीच्या डागडुजी व संवर्धनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आकाश डोळस यांनी सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांची भेट घेत निवेदन सादर केले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवादादा पुरंदरे हे देखील उपस्थित होते.

शहरातील या ऐतिहासिक वेशींची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना, यापूर्वी नगरपरिषद, जिल्हा प्रशासन तसेच विविध राजकीय नेत्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आक्रमक सूर या निवेदनातून व्यक्त करण्यात आला.

“सर्व पक्षांचे नेते, नगरपरिषद आणि संबंधित राजकीय व्यक्तींना वारंवार सांगूनही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. शेवटी आपल्या ऐतिहासिक वारशासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच पुढे आली,” अशी ठाम भूमिका आकाश डोळस यांनी व्यक्त केली.

या प्रश्नाची गंभीर दखल घेत अमितसाहेब ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यात देऊळगाव राजा येथील सावखेड भोई वेश व गिरोली वेशींची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

त्यामुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या ऐतिहासिक वेशींच्या संवर्धनाच्या लढ्याला आता निर्णायक बळ मिळाले आहे.

आता स्वप्नातील वेश साकार होणार! देऊळगाव राजाचा इतिहास केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष वास्तुरूपात जपला गेला पाहिजे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमकपणे मैदानात उतरली आहे.

“वेश वाचला, तर इतिहास वाचेल; आणि इतिहास वाचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेवटपर्यंत लढणार!” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

आता प्रश्न केवळ डागडुजीचा नाही, तर देऊळगाव राजाच्या ऐतिहा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button