बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमीस. वर्षावासा निमित्त भेट.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.

दि.२६/८/२०२६.
पातुर्डा: आषाढ पौर्णिमा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्श लाभलेली पावन भूमी पातुर्डा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे दरवर्षीप्रमाणे वाचन. पठण. मनन गेल्या काही दिवसापासून चालू आहे. तरी या धम्म ग्रंथाला भेट देण्यासाठी आद. डॉ. जगदीश गवई साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा व त्यांचे सहकारी आयुष्य माननी सुजाताई जगदीश गवई आद. के.के शेगोकार साहेब उपाध्यक्ष संस्कार भारतीय बौद्ध महासभा जिल्हा बुलढाणा उत्तर विभाग आद. भाऊराव गव्हांदे संग्रामपूर प्रभारी तथा जिल्हा संघटक तसेच वंचित बहुजन आघाडी चे किशोर भाऊ भिडे. बौद्धाचार्य मिलिंद एन वानखडे जिल्हा संस्कार सचिव. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा बुलढाणा उत्तर विभाग आयु. सुनील दाभाडे. रमेश दाभाडे भीम नगर ग्रंथ वाचक. आयुष्यमानी आदित्य वानखडे. हजर होते
सुरुवातीला महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प. दीप . धूपाने पूजन करून त्रिशरण आणि पंचशील घेऊन मार्गदर्शनाला सुरुवात केली. या कार्यक्रमाला सुजाता महिला संघ आणि संघमित्रा युवा संघ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्व पदाधिकारी यांचे स्वागत महिला मंडळातर्फे करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक आज. डॉ. जगदीश गवई साहेब यांनी धम्म म्हणजे काय. अ धम्म म्हणजे काय या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच आद.के.के शेगोकार साहेब यांनी वर्षावास निमित्ताने मार्गदर्शन केले.
आयु. कैलास दाभाडे अध्यक्ष पातुर्डा येथील ग्रंथवाचक यांनी ग्रंथाचा सारांश घेऊन त्यांचे विश्लेषण करून सांगितले. शेवटी सरणतय गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
अशा या पदस्पर्श भूमीत सगळीकडे बुद्धमय वातावरण निर्माण झाले आहे……..✍️🖊️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button