बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

गोद्री तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विनोद भवर यांची सलग तिसऱ्यांदा निवड; युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते सत्कार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी-संजय खेडेकर

चिखली दि. २५ तालुक्यातील गोद्री येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विनोद भाऊ भवर यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांचा बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते तथा युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी युवानेते मृत्युंजय गायकवाड यांनी विनोद भवर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याबद्दल अभिनंदन केले. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, युवानेते मृत्युंजय गायकवाड यांनी विविध ठिकाणी सस्नेह भेटी देत उपस्थित मित्रपरिवार, पदाधिकारी व नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न तसेच युवकांशी संबंधित विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी तुषार बोंद्रे, विष्णूभाऊ मेथे, पत्रकार छोटु कांबळे, विनोद वनारे, महेश बोधेकर, विलास भवर, पिंटू गायकवाड, हर्षल पवार, रणजीत शिंगणे, शाम शिंगणे, यश चोपडा, ज्ञानेश्वर खांडवे, राहुल पवार यांच्यासह चिखली शहरातील शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button