Uncategorizedजळगावा जिल्हाविदर्भ

पिक विमा प्रश्नावर खिरोडा येथे स्वाभिमानीची बैठक संपन्न‌.

-संग्रामपूर

-पिक विमा प्रश्नावर खिरोडा येथे स्वाभिमानीची बैठक संपन्न‌..
–संग्रामपुर कृषी कार्यालयावर ५ डिसेंबरला शेतकऱ्यांनी उपस्थित रहा!प्रशांत डिक्कर यांचे आवाहन..
संग्रामपूर/ तालुक्यातील खिरोडा येथे दि.३ डिसेंबर रोजी पिक विमा प्रश्नावर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थित शेतकऱ्यांची बैठक पार पडली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करुन बैठकिला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रशांत डिक्कर यांनी संबोधित करतांना सांगितले की शेतकऱ्यांना १००% पिक विमा व अतिवृष्टीने झालेली पिकाची नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी शासन प्रशासनाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाभरात वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढले. तरीसुद्धा विमा कंपनीकडून पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करण्याची दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येताच प्रशांत डिक्कर यांनी दि.२२ नोव्हेंबर रोजी पुणे कृषी आयुक्त सहसंचालक विनयकुमार आवटे यांच्या दालनात चार तास ठिय्या देत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम वितरीत करण्यासाठी कृषी आयुक्त कार्यालयाने कंपनीला निर्देश दिले. तसेच बुलढाणा जिल्ह्यासाठी १०३ कोटी २७ लक्ष रुपये मंजूर असुन ४६ हजार शेतकऱ्यांना व्यतीरीक्त रक्कम लवकरच वितरीत करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. पंरतु विमा कंपनीने पिकाची झालेल्या नुकसानिच्या तुलनेत शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई दिली.तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अजुनही रक्कम जमा झाली नाही. याचा जाब विचारण्यासाठी दि.५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता संग्रामपूर कृषी कार्यालयावर उपस्थित रहा असे आवाहन प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बैठकीत बोलतांना केले. यावेळी स्वाभिमानीचे उज्वल पाटील चोपडे,संतोष गाळकर, संतोष दाणे,दादा दाणे,गोलु घटे,प्रल्हाद दामोदर,कचरु भटकर,शेख जब्बार, महादेव हिवराळे,मधुकर दामोधर, यांच्या सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button