अपघातबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

नांदुरात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या घरासमोर कार पेटवली

अज्ञात व्यक्तीकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याचा संशय; पोलिसांचा तपास सुरू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

नांदुरा : शहरातील तिरुपती नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अंबादास हिंगणे पाटील यांच्या घरासमोर उभी असलेली कार पेटवून दिल्याची घटना २० ऑगस्टच्या रात्री घडली. या घटनेत कारचे नुकसान झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास स्कूटीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने पेट्रोलच्या दोन बाटल्या आणल्या होत्या. त्यापैकी एक बाटली कारवर, तर दुसरी घराच्या दिशेने फेकण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर कार पेटवून संशयित घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.

आगीत कारचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेच्या वेळी हिंगणे पाटील हे बाहेरगावी होते. ते रात्री उशिरा घरी परतल्याची माहिती आहे.

या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगणे पाटील यांनी सावकारी कायद्यांतर्गत जमीन परत मिळवली होती तसेच सावकारीविरोधात शेतकऱ्यांना मदत करत असल्याने त्याच पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त केला आहे. मात्र, घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नांदुरा पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button