बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पिंप्री काथरगाव ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा उत्साहात….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

काथरगाव:- २१ ऑगस्ट २०२६
१७७ घरकुलांच्या यादीचे वाचन गाव विकासाच्या विविध विषयांवर सखोल चर्चा पिंप्री काथरगाव गट ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वसाधारण ग्रामसभेचे आयोजन उत्साही व शांततापूर्ण वातावरणात करण्यात आले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ. सुवर्णाताई गणेश टापरे होत्या. ग्रामसभेला गावातील तरुण, महिला तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सक्रिय सहभाग नोंदविला. ग्रामसभेच्या प्रारंभी मागील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर गावातील विविध विकासकामे, आवश्यक सुविधा तसेच आगामी काळातील विकासाचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामसभेदरम्यान जीपीडीपी आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने गावातील विकासाच्या प्राधान्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गावातील शिक्षक श्री. गोपनारायण सर तसेच श्री. गुहाळ सर यांनी गावातील विविध विकासात्मक विषयांवर आपले विचार मांडले. ग्रामस्थांनीही आपल्या समस्या, सूचना व अपेक्षा मांडत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली.
ग्रामसभेतील महत्त्वाचा विषय म्हणून घरकुल योजनेंतर्गत १७७ घरकुलांच्या यादीचे वाचन करून ती ग्रामस्थांसमोर सादर करण्यात आली. तसेच पुढील टप्प्यातील पूरक यादी तयार करण्याचे कामही करण्यात आले. त्यामुळे घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांच्या प्रश्नाला ग्रामसभेत विशेष महत्त्व देण्यात आले.
ग्रामसभेत महिला व युवकांचा लक्षणीय सहभाग राहिला. गावातील विकासकामे पारदर्शकपणे व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी ग्रामस्थांनी विविध सूचना केल्या. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून गावाच्या विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ग्रामसभेचे संपूर्ण कामकाज उत्साही, शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या सूचना व सहभागाचे स्वागत करण्यात आले…….✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button