कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी, ते कृषी अवजारापर्यत 60% अनुदान; नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :गजानन तांगडे खामगांव
खामगाव तालुक्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत मूल्यसाखळी आधारित कृषी व्यवसायांना चालना देण्यासाठी विविध घटकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसाहयाने राबविण्यात येत असून यामध्ये खामगाव तालुक्यामधील 31 गावांचा समावेश करण्यात आला आहे. लघुवेअर हाऊस,गोदामे,शीतगृहे, जैविक खत निर्मिती केंद्रे, पशुखाद्य युनिट, सोया मिल प्रक्रिया केंद्र, फार्मगेट पॅकहाऊस, फळ भाजीपाला प्रक्रिया उद्योग, डीहाय डेशनयुनिट,आणि फळ पिकवणे युनिट, यासारख्या विविध प्रकारच्या कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी प्रकल्प खर्चाच्या 60 टक्के पर्यंत कमाल 60 लाख रुपयाचे बँक आधारित अनुदान उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेती अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणास मदत होईल. प्रकल्प अंतर्गत उत्पन्न वाढीचे स्रोत बळकटीकरण हा घटक राबविण्यात येत असून शेतकरी उत्पादक कंपन्या,शेतकरी गट,महिला स्वयंसहायता गट, ग्राम संघ,प्रभाग संघ, लोकसंचालित साधन केंद्रे आणि ग्रामसभा व ग्रामपंचायतींना विविध कृषी व्यवसाय उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, शेतीतील वाढत्या उत्पादन खर्च,मजुरी टंचाई तसेच हवामानातील बदल लक्षात घेऊन गासरावर कृषी अवजारे स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे नोंदणीकृत महिला बचत गटामार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे प्रकल्प मूल्याच्या 60% किंवा 24 लाख रुपयांपर्यत अनुदान देता येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला स्वयंसहायता गट, ग्रामसंघ,प्रभा संग,तसेच इतर पात्र संस्थांनी आवश्यक कागदपत्रांचा प्रकल्पाच्या डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावा असे आव्हान प्रकल्प संचालक, अकोला यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
आमसरी, सुजातपूर, पिंपरी देशमुख,बोरजवळा,उमरा, इवरा, वाकुड, कुऱ्हा,राहुड,बेलूरा,हिवरा खुर्द, निपाणा,ज्ञानगंगापूर, जयपुर लांडे, जळका भडंग,हिवरा, शेलोडी, नागझरी बु, नागझरी खु. गणेशपूर, बोरी अडगांव, पाळा, दस्तापूर, लोणी गुरव, बोथाकाजी, देऊळखेड, शहापूर, वहाळा खु.,निमखेड, सावरखेड इत्यादी गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश केला आहे.



