बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

राजमाता जिजाऊ स्मारक विकासासाठी ५० कोटींचा निधी तातडीने मंजूर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मागणीची शासनाकडून सकारात्मक दखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी शंकर शिवरकर

देऊळगाव राजा/सिंदखेड राजा:बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाच्या आणि परिसराच्या विकासाला आता अधिक गती मिळणार आहे. शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या स्मारकासाठी ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेतला आहे.

कामांना मिळणार वेग

२०२४ साली या स्मारकाच्या आणि जिजाऊसृष्टीच्या कामासाठी सुरुवातीला ५० कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. या निधीतून सिंदखेडराजा जवळील ‘जिजाऊसृष्टी’चे काम सुरू करण्यात आले आहे. आजवर या विविध विकासकामांसाठी सुमारे २७ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून, सध्या हे काम अत्यंत वेगाने आणि प्रगतीपथावर सुरू आहे.

ऐतिहासिक वास्तूंचा होणार कायापालट

नव्याने मंजूर झालेल्या ५० कोटींच्या निधीमुळे सिंदखेडराजा शहरातील ऐतिहासिक लखुजी जाधव यांच्या वाड्यातील स्मारकाच्या कामाला मोठी गती मिळणार आहे. यासोबतच राजमाता जिजाऊ यांच्या मुख्य स्मारक परिसरातील विविध मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करणे, पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि ऐतिहासिक वारसा जतन करणे या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. या निर्णयामुळे शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button