महाराष्ट्र
डॉ.जवाहर मलानी हॉस्पिटल परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण

डॉ.जवाहर मलानी हॉस्पिटल परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण
कारंजा तालुका प्रतिनिधी
कारंजा तालुक्यातील डॉ.जवाहर मलानी हॉस्पिटल यांच्या हॉस्पिटल मध्ये २६ नोव्हेंबर रोजी एका महिलेचा सिझर करण्यात आला होता. दरम्यान २७ नोव्हेंबर रोजी लघवी बंद झाल्यामुळे पुढील उपचाराकरिता अमरावती येथे पाठविण्यात आले. त्या ठिकाणी सीरियस झाल्यावर नागपुर येथे नेत असताना मृत झाल्याची घटना घडली आहे. चुकीच्या उपचारामुळे घटना घडल्याची चर्चा असून हॉस्पिटल परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.



