खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

रानभाजी महोत्सवाला तेल्हारा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

*रानभाजी महोत्सवाला तेल्हारा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

*हिवरखेड (वार्ताहर )

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजना अंतर्गत आयोजित तेल्हारा येथे रानभाजी महोत्सवाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला असून या रानभाजी महोत्सवाला तेल्हारा कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी शुभम बोरांडे,तेल्हारा कृषी आत्मा समितीचे अध्यक्ष रुपेश वल्लभदास राठी, मंडळ अध्यक्ष गणेश रोठे, कृषीआत्मा तेल्हारा समितीचे सदस्य प्रशांत भागवत, राजेश भाकरे,संतोष पाचपोर,गौरव राऊत मंडळ कृषी अधिकारी, प्रशांत देशमुख मंडळ कृषी अधिकारी, सौ आर एस देशमुख मॅडम मंडळ कृषी अधिकारी,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पंचायत समिती तेल्हारा येथे रानभाजी महोत्सवाला सुरुवात करण्यात आली तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उपस्थित लाभली शेतकऱ्यांनी आणलेल्या रानभाजीचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून रानभाज्यांचे दैनंदिन जीवनात असलेले महत्त्व व त्यामुळे मानवी जीवनात आरोग्यासाठी होणारे फायदे याबाबतीत मोलाचे मार्गदर्शन मान्यवरांनी उपस्थित शेतकरी बांधवांना व उपस्थित तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना दिले. या रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज सारभुकन , व तसेच आभार प्रदर्शन दिपक मोगरे यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button