बसस्थानक खामगांव आगार परिसरामध्ये पडले खड्डे;चालक व प्रवाशांचे हाल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :गजानन तांगडे खामगांव



खामगाव बस स्थानक परिसराची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने प्रवासी व चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून ठिकठिकाणी डबकी तयार होतात. या डबकी मुळे अपघाताचा धोका वाढला आहे. बस स्थानक परिसरात बस ची तसेच ये -जा व प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. बस स्थानक परिसरात प्रवेश करताना आणि बस बाहेर काढताना चालकांना मार्ग काढावा लागत आहे. पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने वाहनाची नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व पाण्यामुळे परिसरामध्ये चिखल होत असून प्रवाशांना बस पर्यंत पोहोचताना अडचण निर्माण होत आहे. बसस्थानक शहरातील महत्त्वाचा सार्वजनिक वाहतुकीचा केंद्रबिंदू असून, त्या परिसरातील रस्त्याची नियमित देखभाल होणे अपेक्षित आहे. पावसाळ्यात समस्या अधिक गंभीर होण्यापूर्वी बस स्थानक परिसरातील खड्डे तातडीने बुजावेत तसेच रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्या अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, मात्र सध्या संपूर्ण परिसर खड्डेमय झाला असून नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहे



