बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

धानोरा महासिद्ध येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाच्या सामूहिक वाचनास प्रारंभ….!

धानोरा महासिद्ध येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाच्या सामूहिक वाचनास प्रारंभ….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

जळगाव जामोद:- १२ ऑगस्ट २०२६
भारतीय बुद्ध महासभेच्या वतीने जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथे दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या वाचनास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. बौद्धाचार्य विठ्ठल भाऊ तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले. भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा, धम्माचा आणि मानवतावादी शिकवणीचा प्रसार व्हावा, तसेच समाजामध्ये ज्ञान, समता, बंधुता आणि नैतिक मूल्यांची रुजवात व्हावी, या उद्देशाने ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले.
यावेळी बौद्धाचार्य विठ्ठल भाऊ तायडे यांनी ग्रंथाचे महत्त्व स्पष्ट करताना भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्ममार्गाचा अभ्यास प्रत्येकाने करावा, असे आवाहन केले. बुद्धांच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक जीवनात समता, शांतता आणि बंधुभाव वाढविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या सामूहिक वाचन कार्यक्रमासाठी भारतीय बुद्ध महासभा, तालुका जळगाव जामोदचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय व प्रसन्न वातावरणात ग्रंथवाचनाला सुरुवात करण्यात आली. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या माध्यमातून भगवान बुद्धांचा जीवनप्रवास, त्यांचे तत्त्वज्ञान आणि धम्माची शिकवण समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले……✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button