देऊळगाव राजा येथे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :येथील तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि जनसेवा सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज विरंगुळा भवन (आठवडी बाजार परिसर) येथे जागतिक आदिवासी दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा सरस्वती टेकाळे मॅडम होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री बळीराम मापारी आणि डॉ. किरण गिते मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या स्मृतीस आणि आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन केले. याप्रसंगी बोलताना वक्त्यांनी आदिवासी संस्कृतीचे जतन आणि जल, जंगल, जमिनीच्या रक्षणासाठी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला.
या कार्यक्रमाला सौ. भागुबाई कोल्हे, सोळंके ताई, शांतिलाल निरफळे, बाबुलाल शिवरकर, वशीम शहा यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



