खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे सार्वजनिक वाचनालयात पूजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

अंतुर्ली

येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांसोबत बीरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी आदिवासी बांधव नितेश रामदास जांभेकर यांनी प्रतिमेचे पूजन केले. वाचनालयाचे अध्यक्ष एस ए भोई सर, पोलीस पाटील किशोर मेढे, माजी प्राचार्य बी डी बारी, शरद महाजन, भाऊराव महाजन,राजू शिरतुरे, अजय भिल्ल, सुमित सील्वे, महेंद्र चौधरी, प्रकाश कोळी,मिलिंद महाजन, शेख भैय्या शेख करीम, अरविंद पाटील, गणेश पाटील, वाचक, मान्यवर, आदिवासी बांधव उपस्थित होते.
एस ए भोईसर यांनी आदिवासी दिनानिमित्त मनोगतात बोलताना सांगितले की , आदिवासी समाजाचा इतिहास हा केवळ संघर्षाचा नाही तर शौर्य, स्वाभिमान आणि संस्कृतीचा इतिहास आहे. जल, जंगल आणि जमीन यांचे रक्षण कर्ते असणारा हा समाज. निसर्गा विषयीची आणि त्यांचे संतुलन कायम राखण्याचा या आदिवासी समाजाच्या वृत्तीला सलाम. आदिवासी समाज हा निसर्गाचा खरा मित्र त्यांची संस्कृती ,परंपरा आणि हक्क जपणे हीच आपली जबाबदारी आहे. आदिवासी समाजाचे योगदान निसर्ग , संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण. संस्कृती, भाषा आणि परंपरेचे जतन, स्वाभिमान, एकता आणि संघर्षाची परंपरा. या आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यासाठी मोलाचे योगदान आहे. शेवटी बोलताना सांगितले की शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक अनिल वाडीले, ग्रंथपाल अनिल नावकर, किरण धायले यांनी प्रयत्न केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button