गुन्हेगारीमहाराष्ट्रविदर्भ

भाविकांची सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव श्री संत गजानन महाराज मंदिरातील प्रसादालयामधून बॅग लंपास झाल्याची तक्रार शहर पो.स्टे. ला देण्यात आली असून पोलिसांनी फिर्यादी समझ सीसीटीव्ही कॅमेन्याची रेकॉडींग तपासली असता त्यामध्ये चोरटा तोंडाला रुमाल बांधून चोरीची बॅग घेऊन जातांना दिसून येत आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून वाद कलम ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिदी सौ. वैशाली विवेक क्षीरसागर (५०) रा.प्रफुल्ल कॉलनी, साईनगर अमरावती हा १० ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांसह श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी आल्या असता त्यांची

त्यावर हिय्या रंगाची पाने असलेली बॅग मुलाजवळ होती. दर्शनानंतर त्या मह प्रसाद घेण्यासाठी प्रसादालयात गेल्यानंतर तेथे ज व ण झाल्यानंतर मुलगा ग टेबलवर ठेवून हात धुण्यासाठी गेला असता हात धुवून आल्यानंतर त्याला बॅग जागेवर दिसून आली नाही. सदर बॅगेत फिर्यादीचे सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे १० ग्रॅम सोन्याची अंगठी वजन १ ग्रॅम सोन्याचे ओम लॉकेट
वजन अर्धा ग्रॅम सोन्याचे कानातले वजन ३ ग्रॅम, चांदीच्या तोरड्या दोन जोड असा एकूण ७३ हजार रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने होते.
बॅग हरविल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबीयांनी आजूबाजूला शोध घेतल्यानंतरही बॅग मिळून न आल्याने फिर्यादीने शहर पोलिसांत रिपोर्ट दिला. रिपोर्ट दिल्यानंतर तपास अधिकारी गजानन गावंडे यांनी फिर्यादी यांच्या समक्ष मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या डिव्हीआर मधील रेकॉर्डिंग तपासली असता त्यामध्ये एक अज्ञात चोरटा त्यांची चोरीला गेलेली बॅग घेऊन जाताना दिसून आला. त्याआधारे पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button