महाराष्ट्रविदर्भ
प्रसिद्ध कॅसेट सिंगर भगवान सीरसाट यांच्या आई राजूसाबाई पांडुरंग सीरसाट यांचे किडनीच्या दीर्घ आजाराने निधन!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत
संग्रामपूर दि.७/८/२६ सविस्तर वृत्त असे की वरवट खंडेराव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते , प्रसिद्ध कॅसेट सिंगर भगवान सीरसाट यांच्या आई राजूसाबाई पांडुरंग सीरसाट यांचे किडनीच्या दीर्घ आजाराने वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांनी आपल्या मुलांना फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळीचे विचार देऊन, समाजासाठी नेहमीच कार्य करण्यासाठी तत्पर राहावे असे त्यांच्या मुलांमध्ये विचार रुजविले. त्याच कारणामुळे त्यांचा मुलगा एक फुले शाहू आंबेडकर विचाराचा कवी म्हणून उदयास आला. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.



