येवतीत साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात; विविध शासकीय व सामाजिक ठिकाणी अभिवादन

येवती येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरीस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसप्रतिनिधी : आनंद बावस्कर | येवती, ता. बोदवडसाहित्यरत्न, थोर समाजसुधारक डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती येवती येथे शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) विविध शासकीय व सामाजिक ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.जयंती उत्सवाची सुरुवात रविदास नगर येथून करण्यात आली. येथे अण्णाभाऊ साठे यांच्या फलकास पुष्पहार अर्पण करून समाजबांधवांनी त्यांच्या नावाचा जयघोष केला. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. साधना धामोडे, ग्रामसेवक घाटे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर जिल्हा परिषद मराठी शाळेत मुख्याध्यापक गजानन बाविस्कर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शिक्षकवृंद उपस्थित होते. मंडवरे सर यांनीही पुष्प अर्पण करून “अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनाथ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमांना आनंदा बावस्कर, आनंद खरात, गोविंदा खरात यांच्यासह गावातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो” या घोषणांनी वातावरण भारावून गेले आणि जयंती उत्सव आनंदोत्सवात संपन्न झाला.



