देऊळगाव राजा येथील ‘दामिनी पथकात’ वर्षा शिंदे यांची नियुक्ती; महिलांच्या सुरक्षा अन् सन्मानासाठी महाराष्ट्र पोलीस सदैव तत्पर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी ;शंकर शिवरकर
देऊळगावराजा:’कर्तव्य, सेवा आणि सुरक्षा’ या ब्रीदवाक्याला जागत, महिलांच्या सुरक्षा आणि सन्मानासाठी समर्पित असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थानिक ‘दामिनी पथकात’ वर्षाताई शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनहिताय कार्यरत असलेल्या या विशेष पथकामध्ये त्यांची निवड झाल्याने तालुक्यातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.महिला आणि मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने ‘दामिनी पथकाची’ स्थापना केली आहे. छेडछाड, टवाळखोरी आणि महिलांवरील अन्यायाला आळा घालण्यात हे पथक सदैव तत्पर असते. देऊळगाव राजा शहरात महिलांना निर्भय वातावरण मिळावे यासाठी हे पथक आता अधिक वेगाने कार्यरत होणार आहे.वर्षाताई शिंदे यांच्या नियुक्तीमुळे दामिनी पथकाची ताकद आणखी वाढली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण करणे, संकटसमयी त्यांना तत्पर मदत पोहोचवणे आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हीच आपली मुख्य जबाबदारी असेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



