बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेलगाव जहागीर प्रकरणात मोठी घडामोड

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली: तालुखा प्रतिनिधी

शेलगाव: जहागीर येथील जातीवाचक अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड!
मुख्य आरोपी
1.किसन सुखदेव शिराळे व

  1. शिवाजी किसान शिराळे चा माननीय न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज!
    चिखली:-
    दिनांक 30 जून 2026 रोजी शेलगाव जहागीर येथे सौ. उषा रमेश साळवे व त्यांच्या मुलीवर झालेल्या जातीवाचक शिवीगाळ व अमानुष मारहाणीप्रकरणी दाखल गुन्ह्यात बुलढाणा येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज दिनांक 16/07/2026 ला नामंजूर केला आहे.

फिर्यादीच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. राजेश जाधव आणि ॲड. अंबादास जाधव यांनी विविध न्यायनिवाड्यांचा आधार घेत प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड.अरुण गवई, ॲड.विद्याधर गवई, ॲड.शंकर चव्हाण यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले.
सरकार पक्षाच्या वतीने, सरकारी अभिवक्ता मा.भटकर साहेबांनी युक्तिवाद केला.

माननीय न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला बळ मिळाले आहे.

संबंध समाजाचे प्रमुख स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मनीष मोरे. ॲड राजीव जाधव, ॲड सतीश गवई, प्रा.राजेंद्र गवई, विनोद साळवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, तालुका अध्यक्ष संजय धुरंधर, प्रविण खरात, सुमेध जाधव, संजय जाधव, प्रकाश बनकर तथा पदाधिकारी व कार्यकर्ते, विलास घोरपडे, दिपक साळवे, पत्रकार हिम्मतराव जाधव, प्रशांत डोंगरदिवे, छोटू कांबळे,विकी शिनगारे, प्रा.मिलिंद मघाडे, पँथर संकेत जाधव, विविध संघटना, पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी, शेलगाव जहांगीर गावकरी मंडळी, स्थानिक चिखलीकर तसेच संपूर्ण समाज बांधव या सर्वांचे संपूर्ण लक्ष पोलीस प्रशासनाकडे लागले असून, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आरोपींना तातडीने अटक होईल, अशी समाजाची अपेक्षा आहे.

न्याय हा केवळ मिळालाच पाहिजे असे नाही, तर तो होताना दिसलाही पाहिजे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button