एससी एसटी आरक्षण बचाव कृती समिती मालेगाव जिल्हा वाशिम च्या वतीने एक दिवशी धरणे आंदोलन संपन्न.




वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव / २१ ऑगस्ट २०२४ रोजी एससी एसटी आरक्षण बचाव कृती समिती मालेगाव जिल्हा वाशिम च्या वतीने मालेगाव तहसील समोर एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न झाले. यावेळी धरणे आंदोलनामध्ये बबनरावजी बनसोड, देवा इंगळे, जयस शिंदे, एडवोकेट संघनायक मोरे, विनोद भाऊ अंभोरे,रमेश तायडे, प्रकाश गवई, गोविंद वैद्य यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कैलास तायडे यांनी केले . मालेगाव तहसीलदार यांच्यामार्फत भारताच्या महामहीम राष्ट्रपती नई दिल्ली भारत सरकार यांच्याकडे निवेदन सोपविण्यात आले. या निवेदनामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे उप वर्गीकरण करण्यात येऊ नये. तसेच त्या समूहाना नॉन क्रिमीलीअर ची अट लावू नये तसेच अनुसूच जाती अनुसूच जन जाती यांच्या 9 व्या अनुसूचीमध्ये समावेश करावा. एससी एसटी चे कर्मचाऱ्यांचे पदोन्नती मधील काढलेल्या आरक्षण पुन्हा त्यांना बहाल करण्यात यावे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक ऑगस्ट 2024 ला दिलेल्या निर्णयाच्या विरोधात एस एस टी आरक्षणाची वाटणी करू नये. सीएसटीला नॉन क्रिमिनल ची अट लागू करू नये.
निवेदन निवेदनामध्ये खालील मागण्या मागण्यात आल्या

- आरक्षणाचा कायदा करून तो घटनेच्या नव्या सूचीमध्ये समाविष्ट करावा.
- जो अधिकारी एससी एसटी चे आरक्षण भरणार नाही या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी असा कायदा व्हावा.
- माननीय सर्वोच्च न्यायालयातील व उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशांच्या नियुक्ती ऑल इंडिया जुडीशेरी सर्विस चे गठन करून यात आरक्षण लागू करावे
- या देशातील जातीयवाद समाप्त होईपर्यंत एससी एसटी समूहाचे आरक्षण सुरू असावे.
वरिल मागण्या मागून महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे तहसीलदार मालेगाव यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी उपस्थितीमध्ये सारनाथ अवचार, बबनराव बनसोड,देवा इंगळे, भाई गोवर्धन चोथमल, जय एस शिंदे, एड. संघनायक मोरे, कैलास तायडे, विनोद अंभोरे, सुनील तायडे, धम्म मित्र पंडित,रमेश तायडे, प्रकाश गवई, कैलास बनसोड , प्रा. गोविंद वैद्य, शुद्धोधन टाले, ॲड. राहुल गवई, सतीश गवई,संघपाल बनसोड, आजाबराव सदार, रमेश इंगळे, किशोर मोरे, गजानन रोकडे, कदिर भाई, राहुल कांबळे,गणेश वाघमारे, जगदेव ढंगारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते



