जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या रुग्णवाहिका विभाग जळगाव जिल्हाध्यक्ष पदी योगेश पाटील यांची नियुक्ती
– (मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)
सविस्तर वृत्त असे की संजयजी हाळनोर साहेब संस्थापक अध्यक्ष जय संघर्ष चालक-मालक सामाजिक संस्था प्रणित जय संघर्ष चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने गायत्री मोटर्स अँड स्पेअर्स पार्ट चे संचालक कोथळी येथील मुक्ताई ट्रॅव्हल्स तसेच ॲम्बुलन्स चालक योगेश पाटील यांची रुग्णवाहिका विभाग जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली योगेश पाटील यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण भाऊ वाघ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले याप्रसंगी संघटनेचे इतरही पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तालुका अध्यक्ष म्हणून योगेश कपले ,शहराध्यक्ष प्रमोद खडसे, तांत्रिक सल्लागार पियुष पाटील, अशा महत्त्वाच्या सुद्धा नियुक्त्या करण्यात आल्या आहे या सर्वांना संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर साहेब व प्रदेशाध्यक्ष प्रवीण भाऊ वाघ यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या






