खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

युडीज हेअर अँड ब्युटी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम

*जागतिक महिला दिनाचे निमित्ताने बांभोरी प्र.चा. ता-धरणगाव येथे समता फौंडेशन,मुंबई व बांभोरी प्रचा उपकेंद्र तसेच बांभोरी प्रचा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भवती महिला, कुपोषित बालक व अति जोखमीच्या गर्भवती माता यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन व गावाच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा नागरी सत्कार ग्रामपंचायत तर्फे करण्यात आला. समता फौंडेशन,मुंबई व आरोग्य केंद्र तसेच बांभोरी प्र.चा.ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील कुपोषित मुले,अति जोखमीच्या गर्भवती माता,महिला यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आला.तसेच गावातील सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना सावित्रीबाई फुले,राष्ट्रमाता जिजाऊ,यांचे जीवनावर आधारित पुस्तक भेट देण्यात आले. बांभोरी गावातील गर्भवती माता व मुलांना सुदृढ आयुष्य मिळावे यासाठी ग्रामपंचायत व उपकेंद्र तर्फे सर्व उपाययोजना करण्यात येतील तसेच गावात स्त्री-पुरुष समानता,लिंग भेद दूर करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतील व असे मत बांभोरी प्रचा चे सरपंच श्री.सचिन बिऱ्हाडे यांनी व्यक्त केले.त्याचप्रमाणे मुलांना व मातांना आरोग्य विषयक घ्यावयाच्या काळजी बाबत व महिलांना राष्ट्रमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना दिलेले संविधानिक अधिकार बद्दल आरोग्य अधिकारी डॉ.प्रीती पाटील यांनी मार्गदर्शन केले . तसेच समता फौंडेशन,मुंबई चे श्री.राजेंद्र दोंड यांनी समता फौंडेशन च्या ग्रामीण भागातील कुपोषित बालक व गर्भवती माता च्या आरोग्यासाठी कार्यतत्पर राहील माहिती दिली. महिला दिनाच्या मंगल प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ.प्रीती पाटील,सीआरपी- सौ.अश्विनी नन्नवरे,आशा सेविका-सौ.सपना नन्नवरे,सौ.अंजना नन्नवरे,सौ.सोनी नन्नवरे,सौ.नीता साळुंके अंगणवाडी सेविका-सौ.इंदूबाई ठाकरे,सौ.आशाबाई बडगुजर,सौ.अनिता सोनवणे,सौ.रंजनाताई नन्नवरे,सौ.शोभा सपकाळे,सौ.अंजना सपकाळे,सौ.अनिता साळुंके.शिक्षक-सौ.सविता बाविस्कर,तसेच सौ.आशा भालेराव,सौ.मीराबाई नन्नवरे, यांचा पुस्तक व पुष्प देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.जगदीश नन्नवरे,श्री.संदीप कोळी,श्री.अमोल नन्नवरे, MPW श्री.प्रशांत पाटील,श्री.महेश बनसोडे,श्री. व गावातील युवक-युवती महिला व बालक यांची प्रमुख उपस्थिती होती.💐👍💐🩺

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button