बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवला; रेशन दुकानदारावर तात्काळ कारवाईची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

जुमडा या गावातील राशन दुकानदार श्री सुखदेव महादु मुख्यादल यांचा परवाना रद्द करा तहसीलदारांना निवेदन

देऊळगाव राजा तालुक्यातील, जुमडा गावातील: परिसरातील रेशन दुकानदाराने गेल्या दोन महिन्यांपासून लाभार्थ्यांना धान्याचे वाटप केले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी थेट तहसील कार्यालयात धडक देत,
राशन दुकानदार श्री सुखदेव मुख्याधदल,संबंधित दुकानदारावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
शासकीय नियमानुसार प्रत्येक महिन्याला शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून गहू, तांदूळ, साखर व इतर जीवनावश्यक वस्तू मिळणे बंधनकारक आहे. मात्र, येथील संबंधित रेशन दुकानदाराने मागील सलग दोन महिने नागरिकांना रेशनचे वाटप केलेले नाही. अनेकदा विचारणा करूनही दुकानदार उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावकऱ्याची प्रमुख मागणी
संबंधित दुकानदाराच्या कारभाराची चौकशी करून त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्याचे परवाना रद्द करण्यात यावा.
दोन महिन्यांचे रखडलेले रेशन लाभार्थ्यांना तातडीने वितरित करण्यात यावे.
पावत्या देऊनही रिकाम्या हाताः शासनाच्या नियमानुसार प्रत्येक लाभार्थ्याला नियमितपणे धान्य मिळणे बंधनकारक आहे. मात्र, येथील अनेक लाभार्थ्यांना मागील मे आणि जून महिन्यात रेशन दुकानातून धान्य देण्यात आले नाही. दुकानावरील मशीनवर अंगठा घेऊन किंवा इतर प्रकारे पावत्या काढल्या गेल्या. मात्र धान्याचा साठा उपलब्ध नसल्याचे सांगन. त्यामुळे गरीबाच्या हक्काचे दाणे नेमके गेले कुठे? असा संताप सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
निवेदन देताना उपस्थिती, गावकरी
उपसरपंच सौ. रमा मधुकर शिंदे, व विठोबा पवार आणी अविनाश मुख्यदल ग्रामपंचायत सदस्य,
देवाळ द‌गडुवा मराले,विश्वनाथ संपत घाडगे,कुंडलिक श्रीरंग कसार,जानेखर मुरलीधर शिंदे, विकास बाबुराव मुख्यदल,गौतम अशोक मुख्यदल,सुर्यकांत गणपत मुख्यदल,गौतम , भिमराव सुदाम शिंदे,भानुदास विनायक धाउगे,रतन रामजी पवार,सुनिता गोविंद जाधव,मदन रमेश मुख्यदल,गोपाल प्रल्हाद मराले,रजामती रामेश्वर गनगे,चंद्रकला नारायण कसार,दगडाबाई भानुदास घाडगे,रतन रामजी पवन,सुनिता गोंविदज,राजामती,मंगल विलस घाउगे,
अमोल कुंडलिक लरके,गोधादी सन्धाकिसन जाधव,पप्पु सर्जेराव मुख्यदल,आशाबाई संजय शिंदे,रमेश निकाजी जाधव,गोविंद राधाकिसन जाधव,सुभाष रामभाऊ कसार,रुख्मन ज्ञानेश्खर काबुकडे,निता प्रदिप पवार,कैलास विजय मालेराव,विनेा रंगनाथ पवार,अविनाश अंकुश मुख्यदल,संख्या सुनिल पवार,कैलास पुंगाराम खांदे,तुळशिराम बबन शिंदे,अमोल कचरूजी शिंदे,अनिल गणपत मुख्यदल,माया समाधान शिंदे, शरद काशीमाय कसार,सोपान तेजराव कसार ,पट विजय दिलीप शिंदे, बंदना निवृत्ती काबुकडे,पड चरण मुरलीधर मुख्यदल,दगडुब सुदाम मुख्यदल,जनाबाई नानाभाऊ मुख्यखक,ललिताबाई रंगनाथ मराले,अमोल,संध्या सुमिल पवार,कैलास खोदे,तुळशिराम अग मुख्यदन मायासमाधान शिंदे,शरद कसार,पदना काबुकड,चरण मुख्यदल,बिलास काशिनाथ कसार,मिलमबाई प्रभाकर मराले,पांडुरंग तुकाराम घाडगे,साहेबराव वसंतराव पवार,भास्कर सुभाष मुख्यदल,संतोषी,काशीनाथ वामनी कसार

यांचेसह गावकरी महिला व पुरुषांसह माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button