आज तेल्हारा शहरात मुख्यमंत्री जन- आरोग्य शिबिराचे आयोजन! अस्थिरोग तज्ञ डॉ. तरुण राठी व डॉ. कौस्तुभ पाटील राहणार उपस्थित! जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ; डॉ. पेंदाम (वैद्य.अधिकारी ग्रा. रुग्णालय तेल्हारा)

विजय घोडे स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी अकोला जिल्हा
तेल्हारा दि. १६/जुलै|
स्थानिक ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे आज मुख्यमंत्री जन- आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .सकाळी १०:०० वाजता पासून तपासणी सुरू होणार आहे. अकोला येथील सुप्रसिद्ध डॉ. तरुण राठी अस्थिरोग तज्ञ व डॉ.कौस्तुभ पाटील , यांचे सह चमू उपस्थित राहणार असल्याबाबत माहिती प्राप्त झाली आहे , तरी जास्तीत जास्त रुग्णांनी मोठ्या संख्येने या शिबिरात उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पेंदाम यांनी याप्रसंगी केले आहे.
ज्या रुग्णांना हाडांचे आजार आहेत जसे की , मणक्याचा आजार , मान दुखणे, कंबर दुखणे, सांध्यांचा आजार, हात- पाय इत्यादी व्याधी असल्यास त्यांनी आज सकाळी १०:०० वाजल्यापासून ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा . सोबत आधार कार्ड व इतर वैद्यकीय दस्तावेज असणे गरजेचे आहे . या शिबिरा अंतर्गत निदानात्मक व उपचारात्मक सोयी- सुविधा ,संसाधने/ साहित्य तथा औषधी यांची उपलब्धता होणार असल्याची माहिती सुद्धा विश्वासनीय सूत्रांकडून याप्रसंगी प्राप्त झाली आहे.



