बुलढाणामहाराष्ट्र

पहुरजीरा येथे चोरट्यांचा धुमाकूळ, एका रात्रीत फोडली तीन घरे.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी- प्रशांत चव्हाण

जलंब – शेगाव तालुक्यातील पहुरजीरा येथे 10 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन घरांमध्ये घरफोडी केल्याची घटना घडली. या तिहेरी चोरीत एकूण 95 हजार 350 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून, परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी सिताराम नारायण कोंडे वय ( 67 ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते पत्नीसह पहुरजिरा येथे वास्तव्यास आहे.10 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 3 वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून. आत प्रवेश केला, चोरट्यांनी कोंडे दाम्पत्यांना जिवे मारण्याची धमकी देत कपाटातील 30 हजार रुपयांची रोकड , पत्नीच्या अंगावरील सुमारे 20 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पाटल्या तसेच 250 रू.किमतीचे धातूचे मंगळसूत्र असा एकूण 50 हजार 250 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला,
याच रात्री चोरट्यांनी गावातील आणखी दोन घरांनाही लक्ष केले. महादेव रामदास वाशिमकर. यांच्या घरातील कपाटातून 22 हजार 400 रुपयांची रोकड लंपास करण्यात आली, तर सुनील चंद्रभान सुरडकर यांच्या घरातून 22 हजार 700 रुपये लंपास करण्यात आले. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने गावकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी सिताराम कोंडे यांच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button