बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

ठेकेदाराच्या मनमानी कारभार मुळे देऊळगाव राजा शहरातील रस्ता नाली धूळखात; लाखो रुपये खर्चूनही समस्या कायम.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ;– शंकर शिवरकर

देऊळगाव राजा शहरांमध्ये सुरू असलेले रस्त्याचे काम,
दुर्गापुरा वार्डामधील, मारुती मंदिर ते झोरे यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली काम रखडला आणि निष्कर्ष दर्जाचा काम सुरू आहे तसेच खोदून ठेवलेले नाली मुळे स्थानिक नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागू राहिला आणि ऐन पावसाळ्यात शाळेतील मुलांना चिखलाचा सामना करावा लागू राहिला, खोदलेले नाली धोकादायक झालेले आहे याची प्रशासन दखल घेणार का तसेच बायपास लागत असलेला दत्तनगर कॉलनी मधील
दत्तनगर येथील मुख्य लागत रुंदीकरण व नाली खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना खूप अडचण निर्माण झालेली आहे आणि प्रवास करण्यासाठी धोकादायक वळण तयार झालेला आहे त्यामुळे तिथल्या रहिवाशीचा संताप जनक प्रतिक्रिया निर्माण झालेली आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तात्काळतेची दखल घेऊन काम लवकरात लवकर सुरू करून द्यावे,
सुरू असलेले रस्ता नाली रुंदीकरण काम संबधित ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, अपघातांचा धोका वाढला आहे.
स्थानिक समस्या: रस्ता खोदल्यामुळे उडणारी धूळ आणि नागरिकांना होणारा त्रास.अपूर्ण कामामुळे साचणारे साडपाणी आणि चिखल.आर्थिक फज्जा: या कामासाठी मंजूर झालेली रक्कम आणि आतापर्यंत झालेला खर्च.ठेकेदाराचा निष्काळजीपणा: ठेकेदाराने काम वेळेत का पूर्ण केले नाही? प्रशासनाने ठेकेदाराला कोणती नोटीस दिली आहे का? असा संबंधित ठेकेदार ला विचारणा केल्या असता ठेकेदारांना उडवा उडवी चे उत्तर दिले, संबंधित ठेकेदार वर कायदेशीर कारवाई करावी ही स्थानिकाची मागणी नगरपरिषद ला करण्यात आली
“रस्ता खोदल्यामुळे घरात आणि रस्त्याने जाणारे नागरिकांना धुळे चा व नालीचा पाण्याचा त्रास सहन करावा लागू राहिला याचे जिम्मेदारी कोण घेणार?प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे.संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून या अर्धवट रस्त्याचे काम मार्गी लावावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button