बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री काशिनाथ खांडेभराड यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026 जाहीर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ; शंकर शिवरकर

देऊळगाव राजा
महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक लोक युवा वृत्तपत्रा द्वारा आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026′ साठी देऊळगा राजा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा येथील अध्यक्ष व देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे माजी अध्यक्ष श्री काशिनाथ पांडुरंग खांडेभराड यांची निवड करण्यात आली आहे , शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी श्री काशिनाथ पांडुरंग खांडेभराड यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती निमित्य दैनिक लोक युवा वृत्तपत्रा द्वारा सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय
कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी ” “राज्यस्तरीय महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026 चे” आयोजन करण्यात येते ,यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर वकील , महिला, सहकार, पतसंस्था, कला, इत्यादी क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील महाराष्ट्र श्री काशिनाथ पांडुरंग खांडेभराड यांची शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026 या पुरस्कारा साठी निवड करण्यात आली असून रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी शेगाव येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तिथे मान्यवरांच्या हस्ते श्री काशिनाथ पांडुरंग खांडेभराड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
काशिनाथ खांडेभराड यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button