
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस.
नांदुरा तालुका
प्रतिनिधी तेजराव तायडे
सांस्कृतिक कार्य संचनालय मुंबई तर्फे वृद्ध साहित्य कलावंतांना महिला पुरुषांना शासनाकडून पाच हजार रुपये महिना मानधन मिळणार आहे त्याकरिता अर्ज दाखल करायचे आव्हा करण्यात येत आहे अर्जदाराचे वय 50 वर्षापेक्षा कमी नसावे व अपंग व्यक्ती असल्यास त्या व्यक्तीचे 40 वर्षापेक्षा कमी नसावे तर अर्जदाराचे उत्पन्न 60 हजार रुपये पेक्षा जास्त नसावी व अर्जदाराने किमान दहा ते पंधरा वर्षे कलाक्षेत्रात गायन कीर्तन कलापथक किंवा गीत लेखन इत्यादी कार्य केलेले असावे व किमान दहा ते पंधरा वर्षे असावे त्याकरिता शासकीय प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे आणि त्यांच्याकडील केलेल्या कार्याचे फोटो सीडी किंवा छापील पुस्तके इत्यादी एक पुरावे म्हणून असणे आवश्यक आहे असे सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांनी आवाहन केले आहे ऑनलाइन अर्ज सादर करून अर्ज तीन प्रतीक घेऊन 2 अर्ज पंचायत समिती कार्यालयात सांस्कृतिक विभागात जमा करावे व एका अर्जावर पोच घेऊन आपल्या जवळ ठेवावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांनी जाहीर केले आहे



