बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा या गावातील आवडता आदर्श शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी गावातील नागरिक यांनी गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा.तालुक्यातील. जुमडा या गावातील.शिक्षक श्री.दिपक भगवान गवई शिक्षक हे जुमडा या गावात जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत असताना परिसरातील शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षापासून अधिक काळ योगदान देत यांनी असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा मिळाली आणि अनेक कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला. असा गावातील पालकांचा म्हणणं आहे . शिक्षकाची बदली झाली अशी माहिती कळतात विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचा वातावरण निर्माण झाला विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितलं जर गवई सर शाळेत नसतील तर आम्ही शाळेत जाणार नाही शिकणार नाही असा हट्ट विद्यार्थ्यांनी धरला व दोन दिवसापासून शाळेत एकही विद्यार्थी जाऊ नये राहिले विद्यार्थ्यांचा भविष्याचा विचार करता पालकांनी तातडीने गटशिक्षकण अधिकारी पंचायत समिती देऊळगाव राजा येथे त्यांना निवेदन देण्यात आले व त्यांच्याकडे मागणी करण्यात आली की श्री दीपक गवई सर यांचा तात्काळ बदली रद्द करावा त्यांना पुन्हा जुमडा या शाळांमध्ये पुन्हा त्यांची नियुक्ती करावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली. गावातील नागरिकांनी निवेदन देताना म्हटले की आमच्या शाळेतील आवडते आदर्श विद्यार्थी प्रेमी शिक्षक असून त्यांची बदली थांबवली नाही तर सर्व गावातील मंडळी आपल्या विद्यार्थ्यास पंचायत समिती येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला व शाळाला कुलूप लावून शाळा कोणीही जाणार नाही असं शिक्षण अधिकारी यांना सांगितले. निवेदन मध्ये नमूद केले की जर शिक्षकाची बदली झाल्यात शाळेचे व गावाचे नुकसान होणार आहे याची आपल्या स्तरावर नोंद घ्यावी तरी शिक्षकाची तात्काळ बदली रद्द करून जुमडा येथे कार्यरत ठेवावे ही विनंती केली

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button