राजुर येथील पंधरा वर्षीय विद्यार्थिनी घरातून बेपत्ता.४० हजार रुपये व कागदपत्र सोबत नेल्याची माहिती, अपहरणाचा गुन्हा दाखल,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :- प्रशांत चव्हाण
बुलढाणा :- तालुक्यातील राजुर (१५ ) वर्षीय विद्यार्थिनी येथील शाळेत जात असल्याचे सांगून घरातून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे, याप्रकरणी बोराखेडी पोलीस यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे,
मिळालेल्या माहितीनुसार राजूर येथील एका महिलेची मुलगी मोताळा येथील विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत आहे.२९जून रोजी सकाळी सुमारे ९:३० वाजता ती शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही. नातेवाईक, मैत्र, व इतर ठिकाणी शोध घेतल्यानंतरही. ती कुठेच मिळून आली नाही. फिर्यादीनुसार, मुलगी घरातील सुमारे ४० हजार रुपये, आवश्यक कागदपत्रे, व काही कपडे सोबत घेऊन गेली आहे. तसेच २९ जून रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
बेपत्ता मुलीचे वर्णन
*वय १५ वर्षे
*उंची सुमारे ५ फूट
*बांधा मध्यम
*रंग गोरा
*चेहरा गोल
*केस लांब
*अंगात गुलाबी रंगाचा टॉप व निळी जीन्स.
*आवाहन: संबंधित मुली बाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ बोराखेडी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



