बुलढाणाविदर्भ

३०/६/२६पासून पुन्हा शाळेची घंटा वाजणार!!! उन्हाळ्याची सुट्टी संपली विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी,. रतन भगत.

संग्रामपूर दि.२९/६/२६ सविस्तर वृत्त असे की उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्या संपल्यानंतर ३० जून २०२६पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय अनुदानित व खाजगी शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची नियमित सुरुवात होणार आहे. दोन महिन्याच्या सुट्टीनंतर विद्यार्थी पुन्हा एकदा दप्तर पुस्तके आणि नवीन स्वप्न घेऊन शाळेकडे मार्गस्थ होणार आहेत. जिल्हाभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली असून स्वच्छता वर्ग खोल्यांची सजावट पाठ्यपुस्तकांचे वितरण तसेच स्वागत समारंभाचे नियोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे फुले, टाळ्यांच्या गजरात स्वागत केले जाणार आहे. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेत वेळेवर शाळेत पाठवावे ,वाहतुकीचे नियम पाळावेत ,तसेच नियमित उपस्थिती राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलेले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांचे ज्ञान ,संस्कार आणि उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार असून सर्व विद्यार्थी नव्या उत्साहाने शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button