क्राईम

विनयभंग प्रकरणी आरोपीस एकूण ५ वर्ष शिक्षा व दंड

मालेगाव (अजय गायकवाड )

तालुक्यातील शिरपूर जैन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेलगाव राजगुरे येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी कार्तिक राधाकिशन उबाळे वय ४० यास ५ वर्ष कारावास व दंडाची शिक्षा पास्को गुन्ह्यात सुनावली आहे. 

आरोपी कार्तिक राधाकिसन उबाळे यांने २०२१ मध्ये आपल्याच गावातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी आरोपी विरुद्ध तत्कालीन कलम ३६३ ३५४ (अ) भादवि सह कलम ८ १० १२ पास्को अन्वये गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दखल करण्यात आले होते. या प्रकरणी सुनावणी दरम्यान न्यायालयामध्ये दाखल पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला विनयभंग प्रकरणात तीन वर्ष शिक्षा व दंड १० पास्को मध्ये एक वर्ष तर आणि कलम १२ पास्को मध्ये एक वर्ष शिक्षा व दंड अशा प्रकारची शिक्षा थोटावण्यात आली आहे. सदर प्रकरणी सत्र न्यायालयात सरकार पक्षा तर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ए. आर. व्यवहारे यांनी युक्तीवाद करून भरीव कामगीरी पार पाडली आहे.
याप्रकरणी पोलिसांच्या पोलीस अधिक्षक अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहायक पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर जैन चे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी गुन्हेगातील फिर्यादी व इतर साक्षीदार यांना योग्य मार्गदर्शन केले. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी केला. तसेच सदर गुन्ह्यात कोर्ट पैरवी महिला पोलीस कॉन्स्टेबल ममता इंगोले यांनी पाहिले. याप्रकरणी सरकार तर पक्षातर्फे अभियोग्यता ए आर व्यवहारे यांनी युक्तिवाद केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button