बुलढाणामहाराष्ट्र

अंतरी खेडेकर रोडा रस्त्याचे काम प्रगतीपथावर

अंतरी खेडेकर रोडा रस्त्याचे काम प्रगतीपथावर

चिखली:- तालुक्यातील अंतर खेडेकर रोडा या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून ते तात्काळ करण्यात यावे. या मागणीसाठी नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांना अंतरी खेडेकर व रोडा येथील शेतकऱ्यांनी बुधवारी दुपारी तीन वाजता निवेदन सादर केले.

मेरा शिवारातून प्रत्यक्षात नारायण विठोबा खेडेकर यांच्या शेतापासून नाली खोदकाम करावे. तसेच रस्त्यावर भराव टाकावा. काम सुरू असताना काही शेतकऱ्यांनी तुम्ही काही शासकीय अधिकारी नाही ते आल्यावर काम होईल असे सुचविले. याप्रकरणी दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे. पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंट पाईप बसविण्यात यावे. रस्त्यावर मुरूम टाकून रोलर फिरण्यात यावे. अशी मागणी निवेदनात केली आहे. या मागणीची तात्काळ दखल घेत रस्त्याचे माती काम पूर्णत्वास नेण्यासाठी नायब तहसीलदार गायकवाड यांनी संबंधित तलाठ्यांना कामावर येणाऱ्या अडचणी दूर करून त्या सोडविण्यासाठी आदेशित केले आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संजय खेडेकर , पंजाब खेडेकर, शिवाजीराव खेडेकर, नारायण खेडेकर, उत्तम माळेकर, दगडू खेडेकर, एकनाथ खेडेकर, राहुल टाकळकर, दीपक काळंगे, सागर खरात, अनिल बबलू, विजय मोरे, आत्माराम पडघान, समाधान मोरे आदी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button