शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी; शिवसेना युवासेनेचे तहसीलदारांना निवेदन,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी -: प्रशांत चव्हाण
चिखली 🙁 दि.16 जून) महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत नवीन निकष लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी शिवसेना युवासेनेच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे उपजिल्हाप्रमुख विलास सुरडकर तालुकाप्रमुख किसनराव धोंडगे युवा सेना शहरप्रमुख आनंद गैची यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल मा. विष्णूदेव वर्मा यांना निवेदन देण्यात आले
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आंदोलनाचे आयोजन करण्यात होते
तहसीलदारांमार्फत राज्यपालाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत असून शेतीमालाला योग्य भाव, वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने सहा महिन्यांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासाठी नवीन निकष लावले जात असल्याने अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात.
यामुळे राज्यपालांनी या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष घालून शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांनी मांडलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या धर्तीवर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमुक्ती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्वरित निर्णय घेण्याचीही मागणी शिवसेना युवासेना चिखलीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी
नंदूभाऊ कऱ्हाडे, श्रीरामभाऊ झोरे विलासराव सुरडकर, किसनराव धोंडगे,शिवाजीराव पवार लालसिंग मोरे नारायण वाणी,अशोक राजपूत आनंद गैची,अण्णा देवकर बंडू सरसे,किशोर डहाळे वसंता अंभोरे अशोकराव मोहिते हरिभाऊ इंगळे समाधान जाधव संतोष देशमुख छगनराव वानखेडे शुभम वानखेडे बंडू गार्डे निवृत्ती घुबे गजानन साखरे, गणेश कुडके साजितभाई अरुण अंबासकर रामराव अंभोरे गजानन कुटे अंकुश डहाके भास्कर शेजोळ विठ्ठल घुबे लक्ष्मण इंगळे कैलास इंगळे दीपक जाधव राजेश लोखंडे संतोष देशमुख सचिन जोशी दीपक सोलाट शेख सोहेल राहुल वरवंदे प्रदीप गरुड रामराव अंभोरे वसंतराव चवरे मंगेश मोळवंडे ऋषी शेळके सलमान शहा गजानन फोलाने प्रकाश शेळके प्रल्हाद कऱ्हाडे, सुपूडाजी कोऱ्हाळे , राजू झोरे बंटी कपूर ज्ञानेश्वर गायकवाड विनायक जाधव देविदास लोखंडे राजू कारले पवन काळे विशाल वानखेडे विजय जाधव प्रकाश काळे विशाल ठेंग आकाश नेवरे कैलास गायकवाड उमेश झोरे समाधान गायकवाड आदी शिवसैनिक उपस्थित होते.



