बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
राज्य सरकारच्या लबाड कर्जमाफी विरोधात रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन!!! शेतकऱ्यांसाठी तुपकर मैदानात! बुलढाण्यात ठिणगी पडली, आता माघार नाही फक्त आरपार!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी रतन भगत.
बुलढाणा दिनांक १५/६/२६ सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रातील बळीराजाला कर्जमुक्त करण्याचे गाजर दाखवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा राज्य सरकारचा बुरखा अखेर फाटला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना म्हणजे निव्वळ आकड्यांचा खेळ आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये फेकलेली धूळ असल्याचा घनाघती आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आजपासून थेट मरणाची बाजी लावली आहे. सरकारच्या बीएम मनी विरोधात तुपकरांनी आज सकाळी १५-६-२०२६ पासून आपल्या निवासस्थानासमोर अन्न त्याग आंदोलनाचे हत्यार उपसले असून आता मागे हटणार नाही. शेतकऱ्यांच्या सरसगड कर्जमुक्तीसाठी आणि हक्काच्या पिक विमा साठी जीवाची भाजी लागणार असा रणधुमाळीचा इशारा प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनामुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी प्रश्नावर पेटून उठण्याची चिन्हे दिसत आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या प्रश्नाकडे वेधून घेतले आहे.



