राज्यावर दुष्काळाचे सावट! एल निनोची धास्ती? पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च स्थान!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी रतन भगत.
दिनांक १५/६/२६ (बुलढाणा) सविस्तर वृत्त असे की मृग नक्षत्र संपत आले असले तरी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दडी मारण्याचे चित्र दिसत आहे. परिणामी पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातच यंदा यल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट होण्याची शक्यता भारतीय विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झालेले असून राज्य शासनाने पिण्याच्या पाणी व्यवस्थापनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता राज्यातील धरणांमधून सिंचनासाठी दिल्या जाणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश जलसंगम पदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी 31 जून रोजी दिले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा यल निनो चा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता असल्याने सर्व जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना अखंडित पिण्याचे पाणी उपलब्ध राहील यासाठी धरणातील पाणी साठा राखीव ठेवण्याची निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या संदर्भात जिल्हास्तरावर तातडीने कृती आराखडा ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
महत्वाचे शासकीय निर्णय असे धरणा मधून शेती व सिंचनासाठी सुरू असलेली किंवा प्रस्तावित पाण्याची आवर्तने तात्काळ बंद करण्यात येणार, पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेला जलसाठा अत्यावश्यक परिस्थिती वगळता इतर कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्था जलसंस्था विभाग आणि पाणीपुरवठा विभाग यांनी पाणी साठ्याचा नियमित आढावा घेणे बंधनकारक राहील. धरणे, कालवे, नद्या आणि नाल्यांमधून होणारा बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाला क** कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. विनापरवाना सुरू असलेल्या मोटारी ,अनधिकृत पाईप लाईन, आणि इतर साधनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा कारवायांचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे. पावसाने उशीर केल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असताना आणि वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झालेले असताना शासनाने पाणी व्यवस्थापनासाठी कठोर अशा प्रकारची पावले उचलायला सुरुवात केली आहे. संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून आणि जबाबदारीने करावा असे आव्हान प्रशासनाने केलेले आहे.



