छत्रपती संभाजी नगरमहाराष्ट्र

जनतेने संधी दिली जनतेच्या विश्वासाला वंचित बहुजन आघाडी जगात आहे.

संभाजीनगर

जनतेने संधी दिली जनतेच्या विश्वासाला वंचित बहुजन आघाडी जगात आहे.

भीमनगर, निसर्ग कॉलनी येथे वंचितची “जनतेसाठी पाणी सेवा.”

औरंगाबाद शहरातील नागरिक गेल्या तीन दिवसांपासून गंभीर पाणीटंचाईचा सामना करत आहेत. या परिस्थितीमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला असून, विशेषतः स्वयंपाक, पिण्याचे पाणी तसेच स्वच्छता आणि आरोग्यविषयक गरजांवर याचा गंभीर फटका बसला आहे.

स्थानिक आमदार आणि खासदार यांना वारंवार विनंत्या करूनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही आणि नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. या परिस्थितीत, गरजू नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीने स्वीकारली आहे.

भीमनगर, निसर्ग कॉलनी, संविधान चौक, लुंबिनी चौक, विश्रांती चौक अशा विविध ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग ३ च्या नगरसेविका करुणा मेघानंद जाधव नागरिकांना पाणीपुरवठा करत आहेत.

जनतेने नगरसेवक म्हणून संधी दिल्यानंतर जनतेची कामे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहून काम करण्याचा निर्धार या पाणी सेवेतून दिसून आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button