खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पदोन्नती सोहळा; संदीप वानखेडे यांना हवालदारपदाचे स्टार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

सेवा ज्येष्ठतेचा सन्मान; संदीप वानखेडे यांची पोलीस हवालदारपदी पदोन्नती

कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळाला गौरव; संदीप वानखेडे हवालदारपदी पदोन्नत

    मुक्ताईनगर : मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सेवा ज्येष्ठतेनुसार पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्याबद्दल संदीप वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या हस्ते त्यांना हवालदार पदाचे स्टार लावून गौरविण्यात आले.

    या प्रसंगी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी संदीप वानखेडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. पदोन्नतीमुळे त्यांच्यावर अधिक जबाबदारी आली असून, यापुढेही त्यांनी प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावावी, अशा सदिच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.

    संदीप वानखेडे यांच्या पदोन्नतीमुळे मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    Admin

    "मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

    Related Articles

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Back to top button