बुलढाणामहाराष्ट्र

शेगाव तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; ७ गावांसाठी ६ विहिरी अधिग्रहित !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मार्चअखेर विहीर अधिग्रणाची संख्या शुन्यावर असताना मे महिन्याच्या अखेरीस परिस्थिती बदलली असून, ७गावातील पाणीपुरवठासाठी ६ खासगी विहीरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
एप्रिल व मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे प्रकल्पांतील तसेच भूगर्भातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. भूजलपातळी खालावल्याने अनेक विहिरींची पाणीपातळी पाणी टंचाई ७ गावांसाठी ६ विहिरी अधिग्रहित कमी झाली असून, काही सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्या
आहेत. त्यामुळे तालुक्यातील ७ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतींकडून प्राप्त प्रस्तावांच्या आधारे शेगाव पंचायत समितीने अधिग्रहणाची सूची जिल्हा
प्रशासनाकडे पाठविली होती. त्यानुसार ६ विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत टंचाई नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे.
तालुक्यातील जानोरी, टाकळी विरो, हिंगणा वैजनाथ, घुई, शेलगाव उजाळ, निंबी आणि कुरखेड या गावांतील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी ६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button