संग्रामपूर तालुक्यातील पाचशे हेक्टर वरील केळीच्या व संत्र्याच्या बागा वादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाल्या.!!! केळी व संत्रा उत्पादकांवर कोसळले आसमानी संकट.!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी, रतन भगत.
संग्रामपूर दि.२/६/२६. सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर तालुक्याला एक जून च्या सायंकाळी वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला. जोरदार वादळामुळे तालुक्यात सुमारे पाचशे हेक्टर क्षेत्रावरील केळी आणि संत्र्याची बाग आडवी आणि जमीन दोस्त झाली. याशिवाय काही गावांमध्ये घरावरील छताचे टिनपत्रे उडून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या वादळी वाऱ्यामुळे बराच काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. वादळ संपल्यानंतर रात्री आठ वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला होता. संग्रामपूर तालुक्यात १ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर केळीची आणि संत्र्याची लागवड करण्यात आलेली आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास वादळ सुसाट्याने आले. वादळाच्या तडाख्यामुळे ५०० हेक्टर केळीची झाडे जमिनीवर पडून केळी उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संग्रामपुर तालुक्यातील टूणकी सोनाळा ,बावनबीर ,लाडनापुर ,मनारडी जस्तगाव ,वरवट खंडेराव, वरवट बकाल, काकणवाडा, निवाना, चांगेफळ, अकोली, पातुर्डा ,कोदरी परिसरात तसेच जस्तगाव मनारडी शेगाव ते वरवट रोड वर वादळामुळे झाडे उन-मडून पडली आहेत. वादळ सुरू असतानाच रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी स्वाराला वादळामुळे पडलेले झाड न दिसल्याने तो झाडाच्या फांद्यावर जाऊन आदळला .या अपघातात दुचाकी स्वाराला सुदैवाने कसलीही दुखापत झाली नाही. सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्याने काही वेळ थैमान घातले. या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. माननीय आमदार संजय कुटे यांनी उपविभागीय अधिकारी, तिन्हीही तहसीलचे तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, यांना झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून न जाता आपल्या नुकसानीची माहिती तात्काळ ग्रामपंचायत ,तलाठी ,कृषी सहाय्यक किंवा संबंधित अधिकारी यांना द्यावी असे आवाहन आमदार संजय भाऊ कुटे यांनी केले आहे.



