बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

संतश्री वासुदेवजी महाराजांचे कृपांकित संस्काररत्न भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचा सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव

सुवर्ण महोत्सव सोत्साह संपन्न‌

संतश्री वासुदेवजी महाराजांचे कृपांकित संस्काररत्न भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचा सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव पंचदिवशीय यज्ञानुष्ठान , वारकरी संत पंचकांच्या सामूहिक ग्रंथ पठणाने तसेच शेकडो आजी माजी विद्यार्थी, बहुसंख्य पालक व प्रेमीजन तसेच महंत स्वामी कृष्णानंद भारती महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व प्रा.श्रीयुत श्रीकांत महाराज भुस्कटे यांच्या पौरोहित्यात अवभृत स्नान, पंच बटु व गोमाता पूजन, ध्वजारोहण, पंचग्रंथ, नवधान्य , मिष्ठान्न, शर्करा , फळ व नाणे तुला आदि विविध धार्मिक विधीत बाळा, प्रौढा आणि मुग्धा यांच्या उपस्थितीत ब्रह्मकुमारी रक्ष्मी दीदी शुभहस्ते कुमकुम तिलक करून , पुरुषोत्तम मासातील गुरुपुष्यामृताच्या पर्वकाळावर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील शेकडो निरागस शिबिरार्थी व शिबिरार्थीनी स्नातकांनी समंत्रक सोत्साह संपन्न केला. सदरहू कार्यक्रमाकरिता संत श्री सखाराम महाराज संस्थान इलोरा , मुक्ताई संस्थान मेहून , गुलाबराव महाराज संस्थान चांदूरबाजार आदि संस्थानांची विश्वस्त मंडळी तसेच महाराजांवर नितांत प्रेम करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक सदभक्त, विद्यार्थ्यांचे पालक व पंचक्रोशीतील लोक महाप्रसादाला बहुसंख्येने उपस्थित होते. असे ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button