बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतकरी वर्गाचा आक्रोश चिखली ; तहसील कार्यालयावर धडक मोर्चा डिझेल नसल्याने शेतकऱ्याचे कामे ठप्प शेतकऱ्यांचा संताप

चिखली ; तहसील कार्यालयावर धडक मोर्चा डिझेल नसल्याने शेतकऱ्याचे कामे ठप्प शेतकऱ्यांचा संताप

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शारदा संजय पवार. दिनांक 18 /5 /2016 रोजी चिखली येथे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. चिखली तालुक्यातील डिझेलच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचे शेती काम पूर्णपणे ठप्प झाले असून संतप्त शेतकऱ्यांनी चिखली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.सध्या खरीप हंगामातील मशागत फवारणी पाणीपुरवठा ट्रॅक्टर पंप सुरू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज आहे मात्र पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यावेळी आंदोलन शेतकऱ्यांनी रिकामे डिझेल कॅन घेऊन तहसील कार्यालयावर प्रवेश करत प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली “डिझेल द्या शेती वाचवा””शेतकऱ्यांचे काम बंद पडेल “अशा घोषणा देण्यात आल्या. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांनानिवेदन देत तात्काळ डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती आंदोलन करताना दिली

चिखली ; तहसील कार्यालयावर धडक मोर्चा डिझेल नसल्याने शेतकऱ्याचे कामे ठप्प शेतकऱ्यांचा संताप

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button