महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी! विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर, जळगावची निवडणूक चर्चेची ठरणार? कोण आहेत इच्छूक?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
दोन वेळा निवडणूक लढवली होती मात्र आता तिसऱ्यांदा शिवसेना पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील हे शिवसेनेकडून इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान संख्याबळाचा विचार करता महायुतीला निर्णायक बहुमत असल्याने महायुतीचाच आमदार होणार असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा तापणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रकअधिकृत अधिसूचना जारी करणे : २५ मे २०२६ (सोमवार)उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत: ०१ जून २०२६ (सोमवार)उमेदवारी अर्जांची छाननी : ०२ जून २०२६ (मंगळवार)उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस: ०४ जून २०२६ (गुरुवार)मतदानाचा दिनांक : १८ जून २०२६ (गुरुवार)मतदानाचा वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० पर्यंतमतमोजणी आणि निकाल : २२ जून २०२६ (सोमवार)सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्यांची नावेसोलापूर: प्रशांत प्रभाकर परिचारकअहमदनगर: अरुणकाका बालभीमराव जगतापठाणे: फाटक रवींद्र सदानंदजळगाव: चंदूभाई व्ही. पटेलसांगली-कम-सातारा: कदम मोहनराव श्रीपतीनांदेड: अमरनाथ अनंतराव राजूरकरयवतमाळ: दुष्यंत सतीश चतुर्वेदीपुणे: अनिल शिवाजीराव भोसलेभंडारा-कम-गोंदिया: डॉ. परिणय रमेश फुकेरायगड-कम-रत्नागिरी-कम-सिंधुदुर्ग: अनिकेत सुनील तटकरेनाशिक: नरेंद्र भिकाजी दराडेवर्धा-कम-चंद्रपूर-कम-गडचिरोली: रामदास भगवानजी आबिटकरअमरावती: प्रवीण रामचंद्र पोतेउस्मानाबाद-कम-लातूर-कम-बीड: सुरेश धसपरभणी-कम-हिंगोली: विप्लव गोपीकिसन बजोरियाऔरंगाबाद-कम-जालना: अंबादास दानवे



