भोनगाव येथे मातोश्री शेत रस्त्याचे लोकार्पण

स्टार भारत लाईव्ह स्टेटस
श्याम पहूरकर
शेगाव तालुक्यातील भोनगाव येथे ग्रामीण विकासाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित “मातोश्री शेत रस्ता” कामाचा शुभारंभमोठ्या जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार मा. ना. श्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या अथक पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या महत्वाकांक्षी रस्ते विकास कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार श्री आकाशदादा फुंडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. भोनगाव परिसरातील शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामस्थांसाठी हा रस्ता विकासाचा नवा महामार्ग ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मागणीला अखेर हिरवा कंदील मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये
आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील शेतरस्त्याच्या माध्यमातून शेतीमाल वाहतूक, विद्यार्थ्यांची ये-जा, आपत्कालीन सेवा आणि ग्रामीण संपर्क अधिक मजबूत होणार असल्याने हा प्रकल्प ग्रामीण भागासाठी वरदान ठरणार असल्याचे बोलले जात आहे. कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी, महिला, युवक आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यावेळी परिसरात घोषणाबाजी, जल्लोष आणि टाळ्यांच्या कडकडाटात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गावाच्या विकासासाठी
शासन कटिवद्ध असल्याचा विश्वास यावेळी उपस्थितांना देण्यात आला. या दिमाखदार कार्यक्रमाला नायब तहसीलदार ऋतुजा पारखे मॅडम, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भाऊ डिवरे, राष्ट्रीय परिषद सदस्य संतोष बापू देशमुख, जिल्हा सचिव राजेंद्र भाऊ देवचे, मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते सदस्य राजेंद्र हेलगे, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र बोले, भाजपा नेते संतोष देशमुख, युवा सेना तालुकाप्रमुख उमेश शेळके पाटील, शिवसेना विधानसभा संघटक उमेश पाटील अवचार, सरपंच पती लक्ष्मण गवई, भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी अनंता बरडे, भाज्या
पूथ प्रमुख राहुल धनोकार, प्रकाश भारसाकडे, दिलीप पहुरकर, महादेव तायडे, चेतन भामोद्रे, सागर शेळके, शुभम वर्ग, पवन भारसाकळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी, शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, विविध विभागांचे कर्मचारी तसेच हजारो प्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान विकासकामांच्या माध्यमातून गावागावातपरिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले
की, “ग्रामीण भागाचा विकास हा केवळ घोषणा देऊन होत नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष कामे करावी लागतात. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी रस्ते, पाणी, वीज आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे.” केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नातून आणि पालकमंत्री आकाशदादा फुंडकर यांच्या पुढाकारातून भोनगावात सुरू झालेल्या या “मातोश्री शेत रस्ता कामामुळे परिसरातील विकासाला नवी गती मिळणार असून भविष्यात आणखी विकासकार्माचा पड़ाका पाहायला मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. भोनगावच्या विकासाच्या दिशेने टाकलेले हे ऐतिहासिक पाऊल आगामी काळात ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी उरणार असल्याची चर्चा संपूर्ण परिसरात रंगू लागली आहे



